*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा अध्यक्ष लेखक कवी पांडुरंगजी कुलकर्णी लिखित अप्रतिम काव्यरचना*
*गोड अगोड ( गंमतिका )*
********************
तसा वरवरी गोड गोजिरा
सुखीच आम्ही दिसलो जोडा
संसाराच्या चक्रव्युहामधी
दैनंदिन परी आहे राडा…१
प्रेमळ आम्ही गोड जोडपे
होतो आधी अता वाकडे
प्रेमविवाहा करुन फसलो
आता खातो सदाच जोडे…२
काय काय ती स्वप्ने होती
आणा भाका मनोरथे ती
चक्क चुरा हो झाला त्याचा
पश्चाताप न् झाली माती…३
सुंदर कवळी शेंग होती ती
गोलमटोल ती लाडु झाली
स्वत: भोपळा असते आणिक
मला त्यातले बी हो म्हणती…४
काय करावे सुचतच नाही
संसाराच्या चक्रव्युहामधी
सांगुन तुम्हा ठेवत आहे
नका अाडकु प्रेमाच्या मधी…५
••• पांडुरंग कुलकर्णी नाशिक
( संपूर्ण काल्पनिक )