*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी संजय धनगर धनगव्हाळ लिखित अप्रतिम काव्यरचना*
*‘माणूसकी नसलेला माणूस’*
पोरगा धावतपळत आईकडे गेला
मी राजकीय पक्षाचा सदस्य झालो म्हणाला
आई हसली नाही रूसली नाही
कसलाच लवलेश
तिच्या चेहऱ्यावर दिसला नाही
पोरगा तसाच वडिलांकडे गेला
राजकीय पक्षाचा सदस्य झाल्याच
सांगू लागला
वडिल गालातल्या गालात हसले
मुलाला जवळ घेऊन म्हणाले
उगाच कशाला फसला
नेते त्यांच्या कामासाठी
जवळ करतात
खोटी सहानुभूती दाखवून
गाडी मागे पळवतात
तू त्यांच्यासाठी राबशील
तुला शाबासकी देतील
त्यांच मतलब साध्य झाल्यावर
तुला टाळत जातील
नेता म्हणजे माणूसकी नसलेला माणूस
तू उगाच त्यांच्या नादी
लागु नको
पुढाऱ्यासारखा वागू नको
या नेत्यांनी कोणाचं भलं केलं
तर तुझं भलं करतील
त्यांनी दिलेल्या पदाच्या तुकड्यावर
तुला मागे मागे पळवतील
अरै ते मस्त पोटभर जेवतात
आणि त्यांच्यासाठी मरमर करणाऱ्यांना उपाशी ठेवतात
तू त्या नेत्यांसाठी घाम गाळायचा
त्याने ऐसी गाडीत फिरायचं
तुझा वापर करून
त्याने त्यांच्या सात पिढ्यांच्या
भलं करून घ्ययचं
पण तुझ्या पोटापाण्याच काय
अरे तू कितीही त्यांच्यासाठी राबला
तरी तुझ्या घामाच मोल
त्यांना कळणार नाही
तुझ्या भुके झळ
त्यांच्या काळजाला भिडणारा नाही
आपला वाटणारा नेता
तो कोणालाही जवळ करत नसतो
त्यांच साध्य झाल्यानंतर
तो कुठेही दिसत नसतो
म्हणून त्यांच्या श्रीमंत पेक्षा
आपली गरीबी श्रीमंत आहे
त्यांच्यासाठी पंच पक्वान्न
तर आपल्यासाठी चटणी भाकर बरी आहे
घाम गाळून कमावलेली भाकर
लाखमोलाची असते
आपल्या कष्टाची भाकरीची चव
त्यांच्या जेवणाला नसते
तेव्हा त्या पुढाऱ्यांच्या मागे पळण्यापेक्षा
स्वाभिमानाने कष्ट करून
अभिमानाने जगायचं
स्वत:च्या हिंमतीने स्वतःच
अस्तित्व निर्माण करायचं
*संजय धनगव्हाळ*
*(अर्थात कुसुमाई)*
९४२२८९२६१८
९५७९११३५४७