*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शब्दांची माझ्या ..बेरोजगारीची सुखस्वप्ने*
तिसावे..
सन्मानाच्या पायघड्या उलगडताचं
कौतुकाने शब्दही आखडले
त्रेधातिरपीट सदा नित्याची
निमित्तापुरतं यजमानपद स्विकारले
शब्दांच्या प्रसादातही प्रमाद माझे…..गेलेले हसू परतले
बेरोजगारीची सुखस्वप्ने शब्दांची
चारभींतीच्या समानतेला कंटाळले
कोशात रमणारे माझे…शब्द
वेषांतरकरून भटकू लागले
शालीनतेचं गारूड पांघरून
वळचणीला तिष्ठत राहिले..
जन्मोजन्मीची शब्दांची पुण्याई
कालखंडाला जोडून घेतली
झूल अंगावरून उतरवताचं
आपलेपणाची आर्तता दाटली..
बेरोजगारीची सुखस्वप्नं पाहणा-या
माझ्या..शब्दांना जागं केलं
उरीपोटी कवटाळूनं कुरवाळूनं
कागदावर नातं रेखाटलं..
बाबा ठाकूर