You are currently viewing आॕनलाईन लायसंन्स सुविधेतील त्रुटी दूर करा….

आॕनलाईन लायसंन्स सुविधेतील त्रुटी दूर करा….

जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची मागणी.

वैभववाडी

विना परवाना वाहन चालवणे हा दंडनीय गुन्हा आहे. तसेच १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर स्वतःचा परवाना मिळणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. पण या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये तो परवाना मिळवणे  सर्वसामान्यांना शक्य नाही. आॕनलाईन परवान्यांची किचकट प्रक्रिया सुलभ करावी अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने मा.राजेंद्र सावंत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्याकडे मेलद्वारे केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून आपण सप्टेंबर २०२० मध्ये पदभार स्वीकारला आहे. मागील वर्षभर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे पद रिक्त होते. त्यामुळे जिल्ह्यातील अनेकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. परंतु आपल्या रूपाने जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मिळाल्याने आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होईल अशी आशा वाटते. काही दिवसापूर्वी आपल्या कार्यालयातील काही कर्मचारी आणि एजंट यांच्याकडून झालेला भ्रष्टाचार समोर आला आहे.

आम्ही संस्थेच्यावतीने मागणी केल्याप्रमाणे वैभववाडी तालुका येथे महिन्यातून एक दिवस आरटीओ कॅम्प भरवला जात होता. परंतु कोविड महामारीच्या काळापासून कॕम्प बंद झालेला आहे.आता सर्व व्यवहार सुरळीत होत असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी होणारे आरटीओ कॕम्प पुन्हा सुरू करावेत. ते शक्य नसल्यास तालुकानिहाय कोटा ठरवून द्यावा अन्यथा एक दिवस एक तालुका असा ठरवून दिल्यास जिल्ह्यातील सर्व नागरिकांना याचा फायदा होईल.

तसेच लर्निंग लायसंन्ससाठी ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर अपाॕयमेंट डेट मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अपाॕयमेंट डेटच्या ऑप्शनवर गेल्यानंतर Next 30 Days Slots are not  Available असा मेसेज दाखवला जातो. सर्वसामान्य लायसंन्स धारकांला सायबर कॅफेमध्ये जाऊन ऑनलाईन लायसंन्स मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. अशा प्रकारच्या तक्रारी संस्थेकडे आलेल्या आहेत. सर्वांनी एजंट मार्फतच लायसंन्स मिळवावीत अशी रचना केली आहे की काय ? अशी शंका येते.

तसेच आपल्या कार्यालयाचे (०२३६२-२२९०५० व २२९०२०) या दोन्ही  दूरध्वनी क्रमांकांची रिंग होते, परंतु उचलले जात नाहीत. तसेच प्रवास करताना लायसंन्स अभावी दंड भरावा लागत आहे. काहीवेळा अपघात झाल्यास याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उभा राहतो.आपल्या कार्यालयाकडून होणाऱ्या या असुविधेबाबत लवकरात लवकर लायसंन्स धारकांना न्याय मिळावा. आपल्याकडून लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय होऊन अंमलबजावणी व्हावी, अशी विनंती. ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य प्रा.श्री.एस.एन.पाटील, जिल्हा संघटक श्री.एकनाथ गावडे व कोषाध्यष श्री.संदेश तुळसणकर यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा