You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघ अध्यक्ष डॉ. आर बी सिंह यांना श्रद्धांजली.

श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघ अध्यक्ष डॉ. आर बी सिंह यांना श्रद्धांजली.

श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघ अध्यक्ष डॉ. आर बी सिंह यांना श्रद्धांजली.

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे अशासकीय महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघ युनिट यांच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष डॉ. आर.बी सिंह यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी एल भारमल, जिल्ह्याचे सदस्य तथा युनिटचे प्रमुख श्री ज्ञानेश्वर तळकटकर, युनिटचे अध्यक्ष श्री राजू ताटे, अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.सौ.निलम धुरी, प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. जी एस मर्गज, संघाचे सल्लागार सौ. आरती पेडणेकर, महाविद्यालयाचे अधीक्षक श्री आशिष भुजबळ ,तसेच महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या श्राद्धांजली कार्यक्रमाला उपस्थित होते. डॉ.आर बी सिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युनिट प्रमुख श्री ज्ञानेश्वर तळकटकर यांनी केलेआहे. डॉक्टर आर बी सिंह हे कल्याण मधील बिर्ला महाविद्यालयात कार्यालयीन सहाय्यक या पदावर कार्यरत होते. निवृत्तीनंतर त्यांनी अशासकीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे युनियनच्या कार्याला त्यांनी पुढे नेले मुंबई विद्यापीठाचे अध्यक्ष पद भूषविले. काही वर्षे त्यांनी काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणूनही काम केले. मुंबईमध्ये पी.एम अगरवाल कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स ची स्थापना केली, त्याचबरोबर त्यांनी आपल्या गावी सरायदासीमध्ये महाविद्यालयाची स्थापना करून तेथील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे दालन खुले केले. त्यांना अनेक खेळांमध्ये आवड होती विशेषता क्रिकेट व हॉलीबॉल हे त्यांच्या विशेष आवडीचे खेळ होते. राजनीति व शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी फार भरीव अशी कामगिरी केलेली आहे. असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ. जी एस मर्गज यांनी केले व आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा