You are currently viewing “प्राधिकरणातील ज्येष्ठ वेळेवरच मतदान करणार!” – विठ्ठल काटे

“प्राधिकरणातील ज्येष्ठ वेळेवरच मतदान करणार!” – विठ्ठल काटे

*”प्राधिकरणातील ज्येष्ठ वेळेवरच मतदान करणार!” – विठ्ठल काटे*

पिंपरी

“प्राधिकरणातील ज्येष्ठ वेळेवरच मतदान करणार!” असा विश्वास हास्ययोग महासंघाचे संस्थापक – अध्यक्ष विठ्ठल काटे यांनी गुरुवार, दिनांक १४ नोव्हेंबर २०२४ रोजी निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृह येथे व्यक्त केला. महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे, माजी नगरसेवक आर. एस. कुमार, भारती फरांदे, विदर्भ सहयोग मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिगंबर इंगोले, टाटा मोटर्स युनियनचे माजी अध्यक्ष सुजित पाटील, पल्लवी पांढरे, आयुर्वेदाचार्य पृथ्वीराज उगले यांच्यासह सर्व ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. विठ्ठल काटे पुढे म्हणाले की, “प्राधिकरण परिसरात उच्चभ्रू समाजाची वस्ती असून त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. सुदैवाने ते सर्व सतर्क अन् सुज्ञ आहेत. त्यामुळे लोकशाहीत मतदानाचे महत्त्व लक्षात घेऊन ज्येष्ठ निर्भीडपणे आपले कर्तव्य पार पाडत वेळेवरच मतदान करतील!” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी नागरिकांशी संवाद साधताना अण्णा बनसोडे म्हणाले की, “निगडी प्राधिकरणातील नागरिक हे सुजाण आहेत. योग्य उमेदवार कोण आहे याची त्यांना पूर्णपणे जाणीव आणि खात्री आहे. आपले हक्क आणि कर्तव्य याबाबत ज्येष्ठ नागरिक जागृत आहेत. त्यांनी विकासासाठी पालकत्वाची भूमिका बजवावी!” असे आवाहन केले.

यावेळी उपस्थित सर्वांनी सामुदायिक शपथ घेऊन कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनाला अथवा दबावाला बळी न पडता, वेळेवरच मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला. प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भगवान महाजन यांनी प्रास्ताविक केले . सुभाष जोशी, ज्येष्ठांचे मानसपुत्र बाळा शिंदे, पोपटलाल शिंगवी, श्यामसुंदर परदेशी, सूर्यकांत मुथीयान, जगन्नाथ वैद्य, आनंद मुळूक, आशा नष्टे यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात परिश्रम घेतले. अलका बेल्हेकर यांनी सूत्रसंचालन केले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा