You are currently viewing ९ वा राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कार सोहळा- २०२४

९ वा राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कार सोहळा- २०२४

मुंबई :

नूतन गुळगुळे फाउंडेशन (एनजीएफ) हा मुंबईतील सुप्रसिद्ध एनजीओ असून हा एनजीओ शारीरिक आणि मानसिक दिव्यांगांकरिता त्यांचे अधिकार आणि सन्मान मिळवून देण्यात कार्यरत आहे. या संघटनेचा ९वा पुरस्कार सोहळा, *“राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कार” – २०२४,* लवकरच मुंबई येथे संपन्न होणार आहे.

या आलिशान पुरस्कार वितरण सोहळ्याला राजकीय, सामाजिक व इतर क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित असतात.

यंदा ध्येयपूर्ती पुरस्काराचे नववे वर्ष असून एनजीएफ भारत भरातील अनेक राज्यांतून, निरनिराळ्या संस्कृती आणि भाषा असलेल्या दिव्यांगांकडून नामांकने मागवत आहे.

अर्जदारांची मुलभूत पात्रता पुरस्काराच्या सर्व प्रवर्गांसाठी ग्राह्य धरण्यात येईल, अर्जदार व्यक्ती ही शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या दिव्यांग असावी, त्यासोबतच त्यांनी काहीतरी अद्वितीय प्राविण्य मिळवलेले असावे, आपल्या कौशल्यांचा उत्तम वापर केलेला असावा, आपल्या व्यवसायात एखादी सर्वसाधारण व्यक्ती विचार करू शकणार नाही, असे काहीतरी सिद्ध केलेले असावे. अशी एखादी कामगिरी, ज्यामुळे इतरांच्या/ समाजाच्या कल्याणासाठी दिलेले भरीव योगदान पुरस्कार नामांकन मिळवण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल.

*पुरस्कार श्रेणी*

Ø *वैयक्तिक पुरस्कार* (४ वैयक्तिक श्रेणीतील पुरस्कार).

Ø *माय लेक पुरस्कार.*

Ø *कौटुंबिक पुरस्कार* (एकाच कुटुंबातील दोन /तीन सभासद दिव्यांग असतील ).

Ø *संस्था पुरस्कार* ( सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था ).

Ø *जीवन गौरव पुरस्कार*(६५ वय व अधिक).

Ø *मरणोत्तर पुरस्कार*.

Ø *कॅन्सर सर्व्हायव्हर पुरस्कार*

विनंती आहे की इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज नोंदणीकृत कार्यालयात *३१ डिसेंबर २०२४* पर्यंत, त्यांच्या संपूर्ण बायोडाटा / पूर्ण प्रोफाइल, श्रेणी / अपंगत्वाची टक्केवारी अधिकृत प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत) एका पासपोर्ट आकाराच्या फोटोसह सीडी / व्हिडिओ / छायाचित्रे (फक्त 4) खालील gmail वर पाठवावी .

*nutangulgulefoundation@gmail.com*

*Only WhatsApp:*

“For Dheyepurti- 2022”- (Divyang Helpine Nos) – 9920383006

Mumbai- 9819141906

Thane – 9930852165

प्रतिक्रिया व्यक्त करा