कुडाळ :
कुडाळ तालुक्यातील तेंडोली येथील श्री देव रवळनाथ पंचायतन मंदिरात श्रीफळ ठेऊन महायुतीचे उमेदवार नीलेश राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. तेंडोली माजी सरपंच मंगेश प्रभू व राजू राऊळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रचार शुभारंभ करण्यात आला. महायुतीचे नीलेश राणे प्रचंड मताधिक्यानी निवडून यावेत, असे गाऱ्हाणे श्री देव रवळनाथ चरणी घालण्यात आले.
यावेळी प्रताप राऊळ, रामचंद्र राऊळ, माधवी प्रभू, राजेश तेंडोलकर, शुभांगी तेंडोलकर, सेवानिवृत्त पशुवैद्यकीय डॉ. अनिल साळगांवकर, दिलीप राऊळ, शशिकांत आरोलकर, प्रतीक्षा परब, विष्णू तेंडोलकर, हरिश्चंद्र राऊळ, उमेश राऊळ, रवींद्र परुळेकर, प्रसाद सातार्डेकर, सहदेव सातार्डेकर, सुभाष पालकर,प्रशांत धुरी, प्रमोद राऊळ,प्रदीप राऊळ, अभिमन्यू राऊळ, सुमन राऊळ, प्रसाद राऊळ,राकेश परब, निखिल पाटकर,रमेश राऊळ, विवेक राऊळ, विनायक प्रभू, शंकर तेंडोलकर,आपा परब,महादेव तेंडोलकर आदी उपस्थितीत होते.
महायुतीचे उमेदवार नीलेश राणे यांच्या पदाधिकाऱ्यांनी – कार्यकर्त्यांनी प्रचारात जोर धरला असून मतदारांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. तेंडोली गावातून मोठ्या प्रमाणात धनुष्यबाण निशाणीला मतदान करून महायुतीचे नीलेश राणे प्रचंड बहुमतांनी निवडून यावे, असे गाऱ्हाणे श्री देव रवळनाथ चरणी घालण्यात आले. गावातील घरोघरी प्रचार फेरी सुरु असून महायुती सरकारच्या अडीज वर्षातील सिंधुरत्न योजना, लाडकी बहीण योजना अन्य लोकहिताच्या योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविली जात आहे. मतदार संघाचा सर्वांगीन विकास करण्यासाठी विकासाचे एक व्हिजन महायुतीचे उमेदवार नीलेश राणे यांच्यासमोर आहे. त्यासाठी आता त्यांना विधानसभेत पाठवा असे आवाहनही पदाधिकारी-कार्यकर्ते करीत आहेत.