You are currently viewing जेष्ठ भावकवी विगसा

जेष्ठ भावकवी विगसा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी विगसा यांच्या बेंगलोर मधील सत्कार सोहळ्या निमित्त प्रज्ञा करंदीकर लिखित एक शब्दओंजळ*

 

आप्पा हाक प्रेमाची

विगसा टोपण नाव

बहाल केले अत्र्यांनी

केवढा गौरवाचा भाव

शब्द पडती अपुरे

करण्या आपुली प्रशंसा

शुभेच्छा स्विकारा आमच्या

जेष्ठभावकवी विगसा….🌹

 

अगणित साहित्यसंपदा

आप्पा तुमच्या नावावर

कुंचल्यातून साकारलीत

तैलचित्रे संतांची अजरामर

संपादक,लेखक,कवि,चित्रकार

यातून जपलात साहित्य वसा

शुभेच्छा स्विकारा आमच्या

ज्येष्ठ भावकवी विगसा….🌹

 

‘संस्कार शिदोरी’ संग्राह्य

ग्रंथ रसिका भासे कामधेनू

जे जे वांछिल तो ते लाभो

असा खजिनाच त्यात जणू

स्वर्णकलशच हा देऊनी हाती

उमटवीलात वेगळाच ठसा

शुभेच्छा स्विकारा आमच्या

ज्येष्ठ भावकवी विगसा….🌹

 

आईवडिलांच्या संस्काराचा

नेलात पुढे वारसा

सुसंस्कृत मनाचे दर्शन

घडवितो साहित्याचा आरसा

प्रतिष्ठा मानसन्मानाची नाही

धरलीत मनी लालसा

शुभेच्छा स्विकारा आमच्या

जेष्ठ भावकवी विगसा….🌹

 

थोरा मोठ्या साहित्यिकांना

पाहिले अनुभवले जवळून

तुमच्यासम तुम्हीच भाग्यवंत

टाकावी नजर ओवाळून

ऋषीतुल्य व्यक्तिमत्व खुलून

आले या दिग्गजांच्या सहवासा

शुभेच्छा स्विकारा आमच्या

ज्येष्ठ भावकवी विगसा….🌹

 

व्यवसायातून घडत गेलात

जोडत गेलात मैत्र

आयुष्यात म्हणून अजून

दरवळणारा चैत्र

रसिक हृदयी राज्य करा

असेच रहा प्रियसा

शुभेच्छा स्विकारा आमच्या

ज्येष्ठ भावकवी विगसा….🌹

 

गप्पाटप्पा चहापाणी करत

रंगविता तुम्ही काव्य मैफिली

मार्गदर्शन तुमचे सहज सोपे

देते नवोदितांना गुरुकिल्ली

एकाच नावापुढे व्याख्याते मुद्रक

प्रकाशक साहित्यकार इतकी

बिरुदे दिसत नाहीत सहसा

शुभेच्छा स्विकारा आमच्या

ज्येष्ठ भावकवी विगसा….🌹

 

आजारावर मात केलीत

कृपा भगवंताची

साहित्य सेवेसाठी दिली

शारदेने शतवर्षे आयुष्याची

साहित्याच्या मांदियाळीत

हि-यावाणी शोभून दिसा

शुभेच्छा स्विकाराआमच्या

ज्येष्ठ भावकवी विगसा….🌹

 

सिध्दहस्त लेखणी आपुली

ठेवो अविरत अखंड श्वासा

परिचय देण्या फक्त पुरेसा

आम्हा शब्द भावकवी खासा

आनंदाची करत राहो पेरणी

साहित्याचा प्रवास हा सुंदरसा

अमृतमहोत्सवी वर्ष आपुले

स्विकारा शुभेच्छा ज्येष्ठ भावकवी विगसा…🌹

जेष्ठ भावकवी विगसा….🌹🙏🏻

*प्रज्ञा करंदीकर*

बंगळुरु

९/११/२०२४

प्रतिक्रिया व्यक्त करा