You are currently viewing श्री गजानन विजय काव्यंजली काव्यपुष्प – ७१ वे

श्री गजानन विजय काव्यंजली काव्यपुष्प – ७१ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी अरुण वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

।। गण गण गणात बोते ।। जय गजानन श्री गजानन ।।

___________________________

श्री गजानन विजय काव्यंजली काव्यपुष्प – ७१ वे

अध्याय – १२ वा , कविता – ५ वी

__________________________

 

लोकांनी असे विचारता । पितांबर झाला बोलता । मी आलो इथे आता । गुरूंची आज्ञा झाली म्हणून ।। १ ।।

 

मी शिष्य आहे गजाननांचा । पितांबर शिंपी नावाचा ।

मज शब्द प्रमाण स्वामींचा । म्हणून आलो कोंडोलीला ।।२।।

 

पितांबराचे वृक्षावरी बसणे । न घाबरता फांद्यावरून फिरणे।

आणिक ऐसे बोलणे । ऐकून, रागावले लोक सारे ।।३ ।।

 

म्हणे देशमुख कोंडोलीचा । कर सिद्ध तू आहेस शिष्य गजाननाचा । वठलेला वृक्ष हा आंब्याचा । आण त्याला तू

पाने कोमल ।४ ।।

 

हा चमत्कार जर तू केला । तरच आम्ही मानू तुला । असे गुरू जैसा चेला । ठेव ध्यानात हे ।। ५ ।।

 

ऐकून देशमुखाचे बोलणे । पितांबर त्यासी म्हणे । ऐका माझे हो सांगणे । परीक्षा अशी माझी घेऊ नका ।।६ ।।

 

हात जोडोनी पितांबर बोले । परी कुणी ना त्याचे ऐकले ।

सारे त्यालाच बोले । करी विनवणी तुझ्या स्वामींना ।।७।।

***********************

क्रमशः करी लेखन कवी अरुणदास

__________________________

कवी अरुणदास – अरुण वि. देशपांडे- पुणे.

_____________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा