*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*फकीर रस्ता चुकलेले….*
काही फकीर रस्ता
चुकलेले,
नाही कुणी कुणाला
मनातून जाणलेले,
नाही कुणी कुणाला मनातून स्वीकारलेले,
ओढून ताणून वरवर
मुखवटे पांघरलेले.
वेदनांचे अडसर
मनात झाकलेले,
वरवर दिखाव्यांचे
थर साचलेले,
ओघळत्या शरीरावरी
कपडे फाटलेले,
मेकअपच्या थरांनी
तोंड रंगललेले.
चिमण्यांच्या
चिवचिवाटाला जागा नसे वळचणीला,
पिंजऱ्यात लव्हबर्ड,
राघू असे पोपटपंचीला,
टायगर डॉग पहुडलेला
घरातील माणसे नाहीत
संवाद साधायला.
सगेसोयरे,नात्यागोत्यांचा
गोतावळा दूर झाला,
मित्रमंडळी येती दुरुन
पार्ट्या झोडायला,
पिझ्झाबर्गर,चिकन,मटन
दारु ढोसायला,
डॅडी,माॅमही जाती आऊट डोअर पार्टीला.
सारेच कसे रस्ता चुकल्यासारखे वागतात,
खरी माया ममता
वात्सल्याला दुरावतात,
आपली माणसे,कोण कोणालाच नाही कळत,
त्यांच्याच सावल्या त्यांना
कशा भेडसावतात.
कां वागतात असे
संस्कृतीचा वारसा हरवलेले,
परक्या लाच माझी माणसे म्हणालेले,
झगमगाटात स्वतः ची
संवेदनशीलता हरवलेले,
कां असे वागतो आपण हे स्वतःला न कळलेले?
🥹🥹🥹🥹🥹🥹
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर
विरार.