You are currently viewing “श्री संत नामदेव जयंती निमित्त वंदन!”

“श्री संत नामदेव जयंती निमित्त वंदन!”

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*“श्री संत नामदेव जयंती निमित्त वंदन!”*

 

नामदेव करी किर्तन नाचे पांडुरंग

भक्तांसाठी अलौकीक असे गोड सत्संगIIधृII

 

भारत-भ्रमण करती नामाचा प्रसार

टाळ चिपळ्यांचा चाले अखंडच गजर

विठूचे गुणगान करती गाती अभंगII1II

 

घराणे श्रीमंतच परी विनम्र अपार

कुटुंबातील सर्व करती नाम गजर

सर्व एका वेळी घेती समाधी होती नि:संगII2II

 

नामदेव सांगती जनाईची पदे अविट

शिष्या ठायी प्रेम आदर करिती प्रगट

जो गाईल पदे अंगणी नाचे पांडुरंगII3II

 

नाम तेची रुप रुप तेची नाम एकच

नाम केशव केवळ जाणे भाव भक्तच

नामा प्रार्थी देवा दिनांस दावा प्रेम रंगII4II

 

काव्य: श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा