वेतोरे पंचक्रोशी शेतकरी यांचा निर्धार – कृषिभूषण उद्यानपंडित श्री.संतोष गाडगिळ
वेंगुर्ले:
शेतकऱ्यांकडे स्थानिक आमदाराचे लक्ष नसून त्यांना वन्यप्राणी तसेच अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गावातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. या मतदासंघाला सुशिक्षीत, सुज्ञ आमदाराची गरज असून आम्हाला बदल हवा आहे. आमचा वेतोरा पंचक्रोशी सह सर्व पाठिंबा हा अपक्ष उमेदवार अर्चना घारे- परब यांना असल्याचे कृषिभूषण उद्यानपंडीत शेतकरी संतोष गाडगीळ यांनी सांगितले.
वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे गावातून रविवारी अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांनी आपल्या झंझावाती प्रचार दौऱ्याला सुरुवात केली. यावेळी त्यांनी घरोघरी जावून ग्रामस्थांच्या भेटीगाठी घेतल्या. या निवडणुकीत मला सहकार्य करा आणि आपला लिफाफा हे चिन्ह घरोघरी पोहचवा असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले. या प्रचार दौऱ्यादरम्यान शेतकरी संतोष गाडगीळ तसेच अनेक ग्रामस्थांनी आपल्या समस्या त्यांच्याकडे मांडल्या. या समस्यांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.
यावेळी गाडगीळ म्हणाले, येथे रोजगार, उच्च शिक्षणाची संधी नाही आहे. शाळांचे खाजगीकरण होत आहे. गरीब शेतकऱ्यांची मुले लाखो रुपयांचे शुल्क भरून शिक्षण घेवू शकत नाही. आम्हाला बदल हवा असून यासाठी अर्चना ताई आमदार हव्या आहेत असे त्यांनी सांगितले.
यावेळी वाईल्ड लाईफ रेस्कुअर या संस्थेतील प्राणीमित्र दीपक दुतोंडकर, डॉ. प्रसाद धमक यांनी ताईची भेट घेतली. वाईल्ड लाईफ रेस्क्यूसाठी तसेच आपत्ती व्यवस्थापनासाठी साहित्याची गरज आहे. त्यामुळे वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर, सिंधुदुर्ग या संस्थेला आर्थिक मदत करावी अशी विनंती त्यांनी केली. तुमच्या मागण्यांची दखल घेण्यात येईल असे आश्वासन ताईनी प्राणीमित्रांना दिले.
आज अर्चना घारे-परब या वेतोरे, खानोली, दाभोली, वायंगणी या गावांना भेटी देणार असून मतदारांशी संवाद साधणार आहेत.