उबाठाचे उमेदवार संदेश पारकरांचे १ कोटी ३० लाखाचे कर्ज नितेश राणेंनी भरले का ?
अपक्ष उमेदवार नवाज खानी : माझ्या गाडीवर विरोधकांकडून शनिवारी हल्ला
कणकवली
महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी सारस्वत बँकेकडून १ कोटी ३० लाखाचे कर्ज घेतले होते. हे कर्ज निवडणुकीआधी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून भरण्यात आले का? हे त्यांनी 15 नोव्हेंबर पूर्वी जाहीर करावे , अन्यथा मी संबंधित कर्जाचा स्टेटमेंट सहीत माझ्यावर आरोप करणा-या संदेश पारकर यांच्या पोलखोल करणार आहे. कारण कर्ज न भरल्यास त्यांचा उमेदवारी अस अर्ज बाद होणार होता, तसेच माझ्या प्रचार वाहनांचा ताफा शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आणि आमदार नितेश राणे यांचे कार्यकर्ते अडवत आहेत. काल वैभववाडीत प्रचार करत असताना माझ्या गाडीवर विरोधकांकडून हल्ला करण्यात आल्याचा आरोप अपक्ष उमेदवार नवाज खानी यांनी केला आहे.
कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते , यावेळी संदेश पारकर हे सातत्याने माझ्यावर टीका करत आहेत. आमच्या समाजात येऊन खानी हे आमदार नितेश राणे यांचे माणूस असल्याचे सांगत आहेत, पण वस्तुस्थिती वेगळी आहे. नितेश राणे यांनी संदेश पारकर यांना उभ केलं आहे. ऐन निवडणूकीपूर्वी पारकर यांचे १ कोटी ३० लाख रूपयांचे कर्ज कोणी भरले ? हे जाहीर करावे. त्यामुळे पारकर यांचे थकीत कर्ज नितेश राणेंनी भरले आहे. एवढेच नव्हे तर जर पारकर निवडून आले तर ते सरकार बनविण्यासाठी भाजपलाच साथ देणार आहेत, कारण वरिष्ठ पातळीवर भाजपा आणि उध्दव ठाकरे शिवसेना सत्ता बनवण्यासाठी एकत्र येतील , असा खळबळजनक दावा अपक्ष उमेदवार नवाज खानी यांनी केला आहे.
मागील आठ दिवसांत मी केलेल्या प्रचारामुळे मला मतदारांची दोन क्रमांकाची पसंती आहे. पुढील काही दिवसांत मी पहिल्या क्रमांकावर जाईन. त्यामुळे माझ्यावर नितेश राणे आणि संदेश पारकर या दोन्ही बलाढ्य उमेदवारांचा दबाव टाकला जात आहे. प्रचार करताना गाड्या अडवल्या जात आहेत. काल वैभववाडी कणकवली प्रचारा दरम्यान माझी गाडी फोडण्याचाही प्रकार झाला. याबाबत मी पोलिसांना कळवले आहे. त्यामुळे मला पोलिस अधिक्षकांनी बंदोबस्त देखील दिला आहे. पण मी यांच्या धमक्यांना मी भीक घालत नसल्याचा इशारा नवाज खानी यांनी दिला आहे.
भाजपाचे आमदार नितेश राणे हे जाती धर्मामध्ये फुट पाडण्याचे काम करत आहेत. मुस्लीम समाजाबाबत सातत्याने वेगळी वक्तव्ये करत आहेत. मात्र ,आम्ही भारताची अखंडता, एकात्मता यासाठी लढा देत आहोत. ज्याप्रमाणे आपले सैनिक सिमेचे रक्षण करत आहेत. त्याचप्रमाणे आम्ही जाती धर्मात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती विरोधात लढत आहोत. हा लढा देत असताना आमच्या जीवाला बरेवाईट झाले तरीही आम्हाला त्याची काहीही फिकीर नाही, असे नवाज खानी यांनी म्हटले आहे.