You are currently viewing कॅमेर्‍यासोबतच…माझं जगणं…!!

कॅमेर्‍यासोबतच…माझं जगणं…!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कॅमेर्‍यासोबतच…माझं जगणं…!!*

बत्तीसावे…!!

 

इतका काळ तुझा

चेहरा मी जपला

उरात बाळगलेला संयमाचा

बांध क्षणांत फुटला..!

 

तुझ्या सिध्दहस्त लेखणीला

फारशी धार नाही

कुणाला जखम व्हावी

इतकी प्रतिभा नाही..!

 

जगणं कळायला लागल्यापासून

तू….माझ्याकडे बघून हसतोस

मोकळेपणानं सांगून टाक

तू..माझ्यामुळेच जगाला दिसतोस.!

 

कॅमेर्‍यासोबतच जगणं.. तुझा

चेहरा ओळखायला लागले

कालांतराने चेहरा… बदलला

तुझ्यातल्या.. मी पणाला मी जपले..!

 

लहानपणापासून दुसऱ्यावरचं राज्य

तू स्वतःवर घ्यायचा

कोणाच्याही न कळत..भावपूर्ण क्षण

माझ्यातचं लपवून ठेवायचा..!

 

जिवलग माणसांना जोडत-जोडत

माझ्यात…सर्वांना कैदेत ठेवतो

आयुष्य..तुझ्या एकट्याचं नाही..रे

तुझ्यावर..मनापासून प्रेम करतो..!

 

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा