You are currently viewing श्री काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट व अध्यात्म केंद्र सावंतवाडीचा महायुतीचे उमेदवार नाम.दिपक केसरकर यांना जाहीर पाठिंबा

श्री काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट व अध्यात्म केंद्र सावंतवाडीचा महायुतीचे उमेदवार नाम.दिपक केसरकर यांना जाहीर पाठिंबा

सावंतवाडी :

सावंतवाडीचे खंबीर नेतृत्व व महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री म्हणून उल्लेखनीय काम करून सावंतवाडीला नावलौकिक प्राप्त करून देणारे नाम. दिपक केसरकर यांना श्री.काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट व अध्यात्म केंद्र सावंतवाडीच्या कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्यांनी नाम.केसरकर यांच्या कार्यालयात भेट घेत १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देत आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

नाम. दिपक केसरकर हे अध्यात्मिक वृत्तीचे असून श्री क्षेत्र सिद्धागिरी कणेरी, कोल्हापूर येथील श्री काडसिद्धेश्वर स्वामींचे भक्त असून कणेरी मठावर झालेल्या सात दिवसीय उत्सवाच्या वेळी देखील महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांनी कणेरी मठावरील कार्यक्रमाच्या नियोजनात कोणतीही कसूर न ठेवता मोठे सहकार्य केले होते. त्याचबरोबर सावंतवाडी येथील अध्यात्म केंद्रात दरवर्षी श्री सद्गुरू काडसिद्धेश्वर स्वामींच्या कार्यक्रमाच्या वेळी देखील त्यांचे सहकार्य असते. श्री सद्गुरूंच्या प्रवचनाच्या वेळी देखील ते आवर्जून उपस्थित असतात. त्यामुळे श्री.अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींनी देखील नाम.केसरकर यांचे त्यांच्या योगदानाबद्दल कौतुक केले होते. नाम. दिपक केसरकर हे आपले गुरुबंधू असल्याने श्री काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्ट व अध्यात्म केंद्र सावंतवाडीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांना जाहीर पाठिंबा दिला असून श्री काडसिद्धेश्वर स्वामींच्या भक्तगणांनी, गुरुबंधू भगिनींनी नाम.केसरकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणावे असे केले आहे.

यावेळी सावंतवाडी मठाचे अध्यक्ष श्री.परशुराम पटेकर, सचिव भगवान राऊळ, सदस्य मंगेश राऊळ, दीपक पटेकर, श्रीम.सुमती कासकर, श्रीम.माधुरी कोरगावकर, श्रीम. वारंग, सौ.विनिता सातार्डेकर, रेखा मिशाळ, गणेश मिशाळ, सौ.प्रतीक्षा मिशाळ, शर्मिला मिशाळ, प्रसाद कासकर, श्याम कासकर, सखाराम गावडे, वनिता मुंज, दीपा मुंज, ओमकार सावंत, निमिष पटेकर, मंगल जाधव, रुपाली रेमुळकर आदी गुरुबंधू भगिनी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा