*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान लेखक कवी वि.ग.सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वास्तवता*
**********
जगणे इतुके जाहले तरीही अजुनी
अंतरास कुणीतरी जाणावेसे वाटते
सत्यार्थ या जीवनाचा गवसला कां ?
याची संभ्रमात आज मन घुटमळते…..
भवताल साराच , स्वमग्नी गुंतलेला
हा जन्म सारा अंधारला असे वाटते
आशा निराशेचा माहोल झगडणारा
अंकुर प्रीतभावनांचा सुकला वाटते….
कुठले वात्सल्य कुठले ते मायापाश
जगताना सारे आज मृगजळ भासते
ऋतुऋतु पंचभुतेही आज बावरलेली
हीच वास्तवता क्षणाक्षणा त्रस्त करते
*****************************
*रचना क्र.१८५
*#©️वि.ग.सातपुते.(भावकवी )*
*📞( 9766544908 ) बेंगलोर*