कणकवलीत नगरपंचायत तर्फे जनजागृती कार्यक्रम…
मतदारांसाठी मतदार हस्ताक्षर अभियान आणि सेल्फी पॉईंट…
कणकवली
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक अनुषंगाने कणकवली नगरपंचायत तर्फे मतदान जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रबोधनपर विविध उपक्रम राबविले जात आहेत. यात मतदारांसाठी मतदार हस्ताक्षर अभियान व सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे. तर स्विप कार्यक्रमांतर्गत कणकवली नगरपंचायत मार्फत मतदान जनजागृतीसाठी विविध कार्यक्रम राबवले जातात आहेत. यामध्ये मतदान शपथ, पथ नाट्य, मतदान जनजागृती रॅली, हे उपक्रम, तसेच मतदार सेल्फी पॉईंट व मतदार हस्ताक्षर अभियान शहरामध्ये विविध ठिकाणी राबविण्यात आले आहेत. सदर जनजागृती कार्यक्रमाकरीता बचत गटाच्या महिला, शालेय विद्यार्थी, नागरिक, कर्मचारी व इतर यांनी देखील सहभाग दर्शविला असून त्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
नगरपंचायतीतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमामध्ये नागरिकांनी सहभागी होऊन २० नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केले आहे.