मोटारसायकल रॅलीने मतदार जनजागृती…!
वेंगुर्ला
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी प्रबोधनपर विविध उपक्रम राबविण्याबाबत दिलेल्या सूचनेनुसार वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे ६ नोव्हेंबर रोजी शहरात मोटरसायकल रॅली काढून मतदार जनजागृती करण्यात आली.
वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालय, हॉस्पिटल नाका, घोडेबांव गार्डनमार्गे पॉवरहाऊस, पिराचा दर्गा, जुना एसटी स्टॅण्ड, दाभोली नाका ते पुन्हा नगरपरिषद कार्यालय या मार्गवर काढलेल्या रॅलीमध्ये नगरपरिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरीक सहभागी झाले होते. या रॅलीत मतदार जनजागृतीपर विविध घोषवाक्यांचे फलक प्रदर्शित करण्यात आले.
दरम्यान, महिला बचत गटामार्फत रांगोळी स्पर्धा, मतदार सेल्फी पॉईट, मतदार हस्ताक्षर अभियान, मानवी शृंखला अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून तसेच नगरपरिषद हद्दीतील सर्व प्रभागामध्ये घंटागाडीद्वारे रोज मतदान जनजागृती करण्यात येत आहे. नगरपरिषदेतर्फे राबविण्यात येणा-या उपक्रमामध्ये नागरिकांनी सहभागी होऊन २० नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.