जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी ; मठ येथे महायुतीची सभा
वेंगुर्ला :
वेंगुर्ला तालुक्यातील मठ गावाची भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय महायुती संयुक्त सभा येथील स्वयंभू मंगल कार्यालयात संपन्न झाली. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी संवाद साधला.
विधानसभा निवडणुकीला आता कमी दिवस शिल्लक आहेत. प्रत्येक मतदारापर्यंत आपल्याला पोचायचे आहे. खासदार नारायण राणे आणि दीपक केसरकर जेव्हा एकत्र येतात तेव्हा विकासाची गंगा सुरू होते, हे दाखवून द्यायचं आहे. आपल्या मतदार संघाला विकासाच्या दिशेने अधिक ताकतीने पुढे घेऊन जायचे असेल तर महायुतीचे उमेदवार मंत्री केसरकर निवडून येणे गरजेचे आहे. इथली जनता सुज्ञ आहे. इतर भागातील पार्सल या मतदार संघातून परत पाठवली जातील. आजपासून पुढेच १५ दिवस आपल्याला जागून काढले पाहिजे. काही लोक दिशाभूल करणार, खोटी अमिश देणार. ही निवडणूक सोपी नाही अटीतटीची आहे. आता कोणतीही हयगय चालणार नाही. पुढील पिढीला चांगले दिवस दाखवायचे असतील तर योग्य दर्जाचे नेतृत्व हवं आणि ते दीपक केसरकर आहेत असे मला वाटत. यामुळे या मातीचा स्वाभिमान, अस्मिता राखायची असेल तर दीपक केसरकर यांना विजयी करा असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी मठ येथे केलं.
राणे व केसरकर यांच्यात वाद लावण्याचं काम राजन तेली यांनी केलं. नारायण राणेंच्या शब्दाची ताकद या मतदार संघात आहे. लोकसभेच्या निवडणुकीत केसरकर यांनी एक ठाम भूमिका घेतली. त्यांनी जो शब्द दिला तो शेवटपर्यंत पाळला व मनापासून त्यांनी काम केलं त्यामुळे त्याची परतफेड करण्याची आता वेळ आहे. या मतदार संघात कोणीतरी यावं व विकासकामांच श्रेय घ्यावं, मंत्र्यांची पत्र घेऊन हे काम मी केलं अस सांगायच हे आता चालणार नाही. या मतदार संघात दीपक केसरकर यांनी भरगोस विकासनिधी आणला आणि महायुतीच्या माध्यमातून हा सर्व निधी आला. याचे श्रेय घेण्याचे प्रयत्न कोणी करू नये. आपल्यात राहुन जो कोणी विरोधी भूमीका घेत असेल त्याची नाव आम्हाला सांगा पुढे आम्ही बघतो असा इशारा मनीष दळवी यांनी सभेत बोलताना दिला.
दीपक केसरकरच पुन्हा का पाहिजेत, तर आज राज्यात कुठेही नसणारी अशी सिंधूरत्न योजना त्यांनी या कोकणात आणली. यामाध्यमातून शेतकरी, महिला, मच्छिमार, युवक यांच्यासाठी कोट्यावधीचे रुपये आणले. शेतकऱ्याला हक्काच्या वस्तू मिळाल्या सर्व विभागाच्या योजना एकत्र आल्या. दशावतारी कलाकारांच्या वाहन व्यवस्थेसाठी १८ ते २० लाख अनुदान देण्याची व्यवस्था त्यांनी केली. याचा साक्षीदार मी आहे. असा दूरदृष्टी असणारा नेता म्हणजे दिपक केसरकर. जिल्हा बँक म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. अनेक योजना राबवायच्या आहेत यासाठी हक्काचा खासदार तर मिळाला आता हक्काचा आमदार पाहिजे. इथल्या युवकांना रोजगाराची संधी द्यायची असेल तर हे पर्यटनाच्या माध्यमातून होऊ शकत आणि यासाठी केसरकर प्रयत्न करत आहेत, असेही मनीष दळवी म्हणाले.
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर, मठ सरपंच रुपाली नाईक, माजी जि प सदस्य दादा कुबल, प्रकाश ठाकूर, सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षक आबा मठकर, मच्छिमार नेते वसंत तांडेल, मठ शक्ती केंद्र प्रमुख विद्याधर बोवलेकर, विभाग प्रमुख मितेश परब, सोसायटी चेअरमन सुभाष बोवलेकर, बूथ प्रमुख अनिल तेंडोलकर, उपजिल्हाप्रमुख सुहास कोळसूलकर, उमेश धुरी, युवासेना जिल्हा प्रमुख हर्षद डेरे, दाभोली उपसरपंच फिनसुअनिता फर्नांडिस, मठ उपसरपंच श्री गावडे, ययाती नाईक, अनुसूचित जाती जमाती महिला अध्यक्ष सोनिया मठकर, उपतालुकाप्रमुख देवा कांबळी, युवतीसेना तालुकाप्रमुख योगीता कडुलकर, पेंडूर माजी ग्रा प उपसरपंच महेंद्र नाईक, दादा गावडे, श्री शिरोडकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सचिन वालावलकर म्हणाले की, सेना – भाजपच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षात परिवर्तन झालं. बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार महाराष्ट्रात आलं. वेंगुर्ला तालुक्यात ३० गावामध्ये करोडो रुपयांचा निधी दीपक केसरकर यांच्या माध्यमातून आला. आता सर्वांना एकत्र येऊन या निवडणुकीला सामोरे जायचं आहे. काही लोक सातत्याने खोट बोलण्याच काम करत आहेत. या मतदार संघात रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ज्यांनी काही कामे करून घेतली ते आज आपणच काम केल्याच्या वल्गना करत आहेत. अशांना थारा न देता केसरकर यांना प्रचंड मागणी विजयी करता असे आवाहन वालावलकर यांनी केले.
दीपक केसरकर आमदार म्हणून काम करत असता त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून ग्रामस्थांनी ज्या ज्या कामांची या मठ गावात मागणी केली अशी विविध कामे या गावात झाली. स्थानिक आमदार व सरपंच यांच्या परवानगी शिवाय कोणतेही विकासकाम मार्गी लागत नाही. भाजपच्या पोलादी कवच कुंडलांच्या मागे लपून राजन तेली हे मंत्री केसरकर यांच्यावर वार करत होते. आज त्यांनीच पक्ष सोडला. येणाऱ्या काळात अशांना योग्य जागा दाखवा. या मांगल्याचा मठापासून केसरकर यांच्या विजयाचा निर्धार करूया असे आवाहन यावेळी नितीन मांजरेकर यांनी केले. उर्वरित दिवसात जास्तीत- जास्त मतदारांपर्यंत, महिलांपर्यंत पोचा. केसरकर यांनी आणलेली विकासकामे पोचवा व राणे – केसरलार एकत्र आले की काय परिवर्तन होत हे दाखवून द्या असे आवाहन दादा कुबल यांनी केले.
राणे व केसरकर यांच्यात वाद लावण्याचं काम राजन तेली यांनी केलं. नारायण राणेंच्या शब्दाची ताकद या मतदार संघात आहे. लोकसभेच्या निवडणुकीत केसरकर यांनी एक ठाम भूमिका घेतली. त्यांनी जो शब्द दिला तो शेवटपर्यंत पाळला व मनापासून त्यांनी काम केलं त्यामुळे त्याची परतफेड करण्याची आता वेळ आहे. या मतदार संघात कोणीतरी यावं व विकासकामांच श्रेय घ्यावं, मंत्र्यांची पत्र घेऊन हे काम मी केलं अस सांगायच हे आता चालणार नाही. या मतदार संघात दीपक केसरकर यांनी भरगोस विकासनिधी आणला आणि महायुतीच्या माध्यमातून हा सर्व निधी आला. याचे श्रेय घेण्याचे प्रयत्न कोणी करू नये. आपल्यात राहुन जो कोणी विरोधी भूमीका घेत असेल त्याची नाव आम्हाला सांगा पुढे आम्ही बघतो असा इशारा मनीष दळवी यांनी मठ येथे महायुतीच्या सभेत बोलताना दिला.
दीपक केसरकरच पुन्हा का पाहिजेत, तर आज राज्यात कुठेही नसणारी अशी सिंधूरत्न योजना त्यांनी या कोकणात आणली. यामाध्यमातून शेतकरी, महिला, मच्छिमार, युवक यांच्यासाठी कोट्यावधीचे रुपये आणले. शेतकऱ्याला हक्काच्या वस्तू मिळाल्या सर्व विभागाच्या योजना एकत्र आल्या. दशावतारी कलाकारांच्या वाहन व्यवस्थेसाठी १८ ते २० लाख अनुदान देण्याची व्यवस्था त्यांनी केली. याचा साक्षीदार मी आहे. असा दूरदृष्टी असणारा नेता म्हणजे दिपक केसरकर. जिल्हा बँक म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. अनेक योजना राबवायच्या आहेत यासाठी हक्काचा खासदार तर मिळाला आता हक्काचा आमदार पाहिजे. इथल्या युवकांना रोजगाराची संधी द्यायची असेल तर हे पर्यटनाच्या माध्यमातून होऊ शकत आणि यासाठी केसरकर प्रयत्न करत आहेत. असेही मनीष दळवी म्हणाले