नेरुर जि प मतदार संघातुन आमदार वैभव नाईक यांना मताधिक्य देण्याचा मतदारांनीच घेतला निर्णय – शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते
कुडाळ
नेरुर जि प मतदार संघामध्ये आमदार वैभव नाईक यांनी केलेला विकास आणि सर्वसामान्य जनतेचा आमदार कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमदार वैभव नाईक म्हणुनच येथील मतदारांनीच ठरवल आपला हक्काचा माणुस म्हणून मताधिक्य देण्याचा निर्णय घेतला आहे असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी व्यक्त केले
नेरुर, कवठी,चेंदवण वालावल येथे आमदार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ शुभारंभ करण्यात आला यावेळी श्री पडते बोलत होते,ते बोलताना म्हणाले कि या भागात विकास मोठ्या प्रमाणात झालेला असुन आपला हक्काचा माणुस आणि केव्हाही उपलब्ध होणारा आपला आमदार वैभव नाईक यांना मोठ्या मताधिक्य देण्याचा निर्णय मतदारांनीच घेऊन लोकसभेला झालेली चुक विधासभेत होणार नाही याची काळजी मतदारच घेतील असे श्री पडते यांनी सांगुन आमदार वैभव नाईक यावेळी पालकमंत्री म्हणून निश्चित होतील असे देवतांचे आशिर्वाद आहेत असेही श्री पडते म्हणाले यावेळी शिवसेनेचे अतुल बंगे,नेरुर जि प शिवसेना विभागप्रमुख शेखर गावडे, युवा सेना उपतालुकाप्रमुख विनय गावडे, नेरूर जि प उपविभाग प्रमुख मंगेश बांदेकर, चेंदवण शाखाप्रमुख किरण कोचरेकर, युवा सेना विभाग प्रमुख रुपेश खडपकर,माजी सरपंच रुपेश वाड्येकर,नेरुर सरपंच सौ भक्ती घाडी, उपसरपंच दत्ता म्हाडदळकर, ग्रामपंचायत सदस्य मंजुनाथ फडके, ग्रामपंचायत सदस्य शंभु नाईक, प्रविण नेरुरकर,विजय लाड, गणेश गावडे, प्रसाद गावडे,सौ लक्ष्मी सडवेलकर, संतोष कुडाळकर, धोंडी नाईक, भालचंद्र रेवंडकर, सुनिल करवडकर,दादु कोळंबकर,हेमंत वालावलकर,रामा कांबळी,अरुण परुळेकर,दादा गुरव, तुकाराम बंगे, नरेंद्र मयेकर, व पदाधिकारी उपस्थित होते