*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरूण गांगल यांनी कालच्या रंगभूमी दिनानिमित्त लिहिलेलं अप्रतिम गीत*
*”कला शब्द रंग”*
कला समृद्ध करते मनुष्याचे जीवन
कलेचा कर्ता आस्वादकांना मिळतो आनंदIIधृII
चित्र शिल्प साहित्य अभिनय नृत्य संगीत
सर्व कलांतून भावना भाषा होते अभिव्यक्त
मानवाचे अंत: प्रेरणेचा उपयोग होतो खूबीनं II1II
भावनांचे एकत्रित संघटन होते मनांत
कलेतून भाव रंगांचे होते प्रकटी करण
शब्दांच्या माध्यमातून रंगछटा उमटतातII2II
कलाकार आस्वादकाचे असते निकोप मन
संवेदनशीलता कलेचा गाभा होतो प्रकट
काळासम वातावरणातून होते प्रतिबिंबितII3II
कलेला नसते भाषा प्रांत आहे भेदातीत
नकलानं दर्शविता येते गुण दोष वर्णन
कला असते प्रत्येकांत होते सुसंस्कृत मनII4II
कलेतून शिकता येते वक्तृत्व संभाषण
शब्द फेकींतून होते सकारात्मक वातावरण
कलेनं जिंकता येते सर्वांचे मन मिळे आनंदII5II
कलेने दुःख दूर होते मनोरंजन अंजन
शब्द उच्चारण पठण स्मरण मिळते ज्ञान
रंजनानं होते समाजाचे आत्म प्रबोधनII6II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.