पुणे:
दिनांक २७ ऑक्टोबर २०२४ रोजी पुण्यात उद्यान प्रसाद मंगल कार्यालयात ज्येष्ठ साहित्यिक , सत्कवी प्राचार्य सू. द. वैद्य सरांच्या “उन्मयी” या १० व्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक संतसाहित्यिक डॉ. सदानंद मोरे , डॉ. न. म. जोशी सर , जागतिक योगगुरू डॉ. विनोद संप्रसाद , डॉ. महेंद्र ठाकुरदास , सुधीर कुबेर व मिहाना प्रकाशनच्या सौ.कुलकर्णी व प्रा. सू. द. वैद्य सरांच्या उपस्थित संपन्न झाले. या प्रसंगी याप्रसंगी डॉ. शिरीष चिंधडे , डॉ. कुदळे , महाकवी कालिदास प्रतिष्ठाचे अध्यक्ष मा. वि.ग.सातपुते , ऋचा कर्वे , श्री व सौ .मकरंद घाणेकर सौ. राजश्री सोले , सुरेश शेठ , तसेच समस्त प्रा. सू. द. वैद्य सरांचा विद्यार्थी परिवार आणि साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी ” उन्मनी ” अवस्थेतील सृजन हे अभिजात दर्जाचे असून उन्मनी अवस्था ही थेट संतपरंपरेशी जोडलेली आहे आणि ही अवस्था निर्मितीची हिमशिखरीय अवस्था आहे, असे उद्गार काढले तर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न. म. जोशी.सर म्हणाले..प्रा. सू. द. वैद्य सरांच्या रचना म्हणजे अध्यात्म आणि भक्ती परंपरेला वाहिलेल्या निवडक रचनांचा संग्रह असून तुलनात्मक त्याचे विश्लेषण केले तर या रचना मराठीतील पंचवीस निवडक यादी केली तर वैद्य सरांचे स्थान त्यांच्या प्रभावळीत निश्चित दिसेल असे उद्गार काढले.
या सोहळ्यास अनेक संतांचे वंशज उपस्थित होते. प्रारंभी राजश्री महाजनी यांनी शारदस्तवन सादर केले. संपादक सुधीर कुबेर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि आणि ऋचा कर्वे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले .आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली…..