मालवण :
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या दैवज्ञ भवन नजीकच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मंगळवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता माजी केंद्रीयमंत्री खास. नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत उपस्थित राहणार आहे. यावेळी शिवसेना-भाजप महायुतीच्या सर्व आहे माझी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर, महेश राणे, आणि भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी केले आहे.