अपंगाची शासकीय गाडी घर कामासाठी, मागासवर्गीय निधीतील झेरॉक्स मशीन भाड्यासाठी लावणाऱ्या सतीश सावंत यांनी भ्रष्टाचाराच्या गप्पा मारू नयेत
*भाजप ज्येष्ठ पदाधिकारी सुरेश सावंत यांची टीका
*सतीश सावंत वीस वर्षे जिल्हा परिषदेत, दहा वर्षे बँकेत, दहा वर्ष बँक अध्यक्ष ही घराणेशाही नाही काय ? केला रोखठोक सवाल
कणकवली
सतीश सावंत हे यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.एका अपंगांच्या नावावर गाडी जि.प. मधून मंजूर करून ती गाडी करंजे कणकवली आणि अशी घरच्या कामा साठी वापरत आहेत .मागासवर्गीय निधी तून एक झेरॉक्स मशीन घेतली ती मशीन कणकवली तहसिल च्या बाजूला एका सेवा केंद्रात भाड्याने दीलेली आहे. तसेच आमच्या भागात उन्हाळयात बकरे,शेळया मेंडी करण्यास येणाऱ्या मेंडपाळांचे फोटो काढून त्यांचे वर शेळीमेंडी कर्ज मंजूर करून घेतले. त्यांनी भ्रष्टाचार निर्मूलनाच्या गप्पा मारू नयेत असा समाचार भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ पदाधिकारी,सुरेश सावंत यांनी घेतला.
सुरेश सावंत म्हणले,
तसेच घराणे शाही संपविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत माजी आमदार राजन तेली भारतीय जनता पक्षात होते तेव्हा त्यांचा मुलगा पक्षाचे कोणतेही काम न करता भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष झाले. वैभव नाईक दोन वेळा निवडून आले आणि तिसरे वेळी ते उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत मग कुडाळ मालवण मधे दुसरा कोणताही कार्यकर्त्याने शिवसेनेमध्ये नाही की काय ? सतीश सावंत वीस वर्षे जी प सदस्य आणि दहा वर्षे बँक संचालक आणि दहा वर्षे बँकेचे अध्यक्ष राहिले ही घराणेशाही नाही तर काय म्हणायचे ? आता गंमत बघा आता सर्व उमेदवारांची संपती जाहीर केली आहे त्या मधे नितेश राणे अकरा कोटी निलेश राणे बारा कोटी वैभव नाईक बत्तीस कोटी राजन तेली अठ्ठावीस कोटी विशाल परब तेहतीस कोटी बघा राणे साहेबाच्या बरोबर फिरत होते त्याच्या कडे राणे साहेबाच्या मुलांच्या पेक्षा डबल प्रॉपर्टी कशी झाली .संदेश पारकर यांच्या कडे आठ कोटी राणे साहेबाच्या मुलांपेक्षा दोन कोटी कमी हा हिशोब जनता प्रत्यक्ष उघड्या डोळ्याने बघत आहे. आता मतदारांच्या ही गोष्ट लक्षात आली आहे.राणे घराने का नको जिल्हा मधे तर ह्यांना जिल्हयात आपली प्रॉपर्टी वाढवायला मिळत नाही. सतीश सावंत हे संचायनी घोटाळा प्रकरणी जेल च्या बाहेर आले तेव्हा त्यांची सर्व मालमत्ता कोर्टाकडून शिल केली होती आता कीती आहे.? माहीत नाही परंतु नक्कीच राणे बंधू पक्षा डबल असणार एवढे नक्की आदरणीय विजय राव नाईक यांनी आपल्या मुलांना पाच पाच लाख रूपये फक्त दिले होते आणि आता बघा किती वर्षात कीती झाले ही कुठली बँक आहे कळतच नाही बरे यांचे व्यवसाय काय तर तेरी बी चुप और मेरी बी चुप म्हणजे चोर तो चोर आणि वर शिरजोर ह्या सर्व गोष्टी मतदारांच्या लक्षात आलेल्या आहेत अशी टीका सुरेश सावंत यांनी केली.