You are currently viewing भाऊबीज

भाऊबीज

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*भाऊबीज*

 

सण दिवाळीत खास

भाऊ बहिण नात्याचा

भाऊबीज सण सदा

आनंद नि उल्हासाचा

 

पवित्र नाते हे सदा

असते भाऊ बहिणीचे

फुलवते प्रीत मनी

असे निस्वार्थ ओढीचे

 

दिवाळीच्या द्वितीयाला

येतो भाऊबीज सण

भाऊराया ओवाळून

मनी नात्यांचे चांदण

 

ओवाळूनिया भावाला

औक्षणताट घेऊन

ताल जणू स्पंदनाचा

भावामनी बाळगून

 

ओवाळीते भाऊराया

देते वस्तू ती प्रेमाची

ओढ लावी सर्वजणा

भाऊबीज या सणाची

 

शब्द देते भाऊराया

आहे भाऊ तुझ्यापाठी

किती आलीत संकटे

तरी उभा तिच्यासाठी

 

भाऊ माझा पाठीराखा

जीव लावते भावाला

गंध नात्याचा मिळतो

दोघांच्या या आयुष्याला

 

सौ कविता किरण वालावलकर

दावणगिरी , कर्नाटक

प्रतिक्रिया व्यक्त करा