*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तुझी भेट होता …..*
तुझी भेट होता असे वाटते की
गुलमोहोराशी जणू बात होते
कळ्यांचा शिरी घेऊनी शिरपेच
गुलाबी केशरी जणू अंग होते ….॥धृ॥
करावे ते काय बोलावे ते काय
लाजून झुरून मान खाली जाय
झुकतात डोळे भुई वरती ते
लाजेने ते पाणी पाणी मन होय ….॥१॥
नजरेत आस स्वप्नात भास
वाट पाहतात नयन भकास
येताच सामोरी तू जरासाच
पळूनच जावे घरात झकास …॥२॥
नजर पाखरू फिरे भिरी भिरी
तुला शोधतसे मग घरीदारी
कशी जीवघेणी मनी असे आस
सदाच वाटते तू आसपास ….॥३॥
अशी कशी ओढ असे कसे कढ
मिलन मनात होई धडधड
जीवा शिवाचे ते अद्वैत घडते
पहाटे गुलाबी स्वप्न ते पडते …॥४॥
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)