You are currently viewing दीपज्योती

दीपज्योती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ कवयित्री विजय केळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*दीपज्योती*

 

ज्योत एक

दिवटीची

मंद तेवे

समईची !! १

 

उजळते

पणतीची

भिती जाते

अंधाराची !! २

 

सुरक्षित

कंदिलाची

भिती नाही

विझण्याची ३

 

मशालही

पेटवावी

क्रांती मग

घडवावी !! ४

 

नवी ज्योत

काकड्याची

मंदिरात

भाविकाची !!५

 

चहुदिशा

प्रकाशित

मने होती

आनंदित !! ६

 

दीपज्योती

निरांजनी

तेणे तेजे

हर्ष मनी !! ७

 

अंगणात

रंगावली

घरोघरी

दीपावली !!८

 

विजया केळकर _____

नागपूर

प्रतिक्रिया व्यक्त करा