*ज्येष्ठ लेखिका कवयित्री चित्रकारा स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*आता मुक्त मी*
जगाचे तोडून पाश सारे
खरा मुक्त जाहलो मी
दुःखाची सारी लक्तरे
पृथ्वीवरी फेकली मी.
आता स्वच्छंद विहरावे
हवे तिथे मजेत फिरावे
नको देहाचा भार सारा
जणू हलके पिस व्हावे.
आता नको ऐकू यायला
कथानव्यथा कुणाच्या
गवसणी घेईअवकाशाला
जडदेह सर्वमुक्तझाला.
जन्मापासूनि संकटाला
सामोरत,कष्टलेमनाला
देहाची करुनि मुटकुळी
कसे सावरले स्वतःला.
आता न हव्यास कसला
ना ध्यास तो जीवाला
क्षुधा तृष्णा नाही मोह
गृह नको निवार्याला.
नाही कुणाचीचिंता,नको
सखे संगती सोबतीला
तनमनधनाची करु मी
मिथ्या, क्षिती कशाला?
☺️☺️☺️☺️☺️☺️
स्वप्नगंधा सतीश आंबेतकर,