*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दिवाळी पर्व*
सांज सकाळी उभ्या नभाळी
तांबूस दिवा दिसतो रोज
उजेड देउन धरतीला या
दिप नभाळी जळतो रोज
कुठली पणती कुठले तेल
कुठली वात जळते रोज
प्रकाश देऊन धरतीला या
अखंड ज्योत तेवते रोज
पिवळी तांबूस ऊन कोवळी
सुवर्ण किरणे येती रोज
तिरपी किरणे धरतीला या
सुवर्ण झळाळी देती रोज
कुठला धर्म कुठली जात
नित्य कर्म करतो रोज
स्व-त्यागातून धरतीला या
दिवाळी पर्व दावीतो रोज
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.