You are currently viewing मारहाण प्रकरण पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांना भोवले?

मारहाण प्रकरण पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांना भोवले?

मारहाण प्रकरण पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांना भोवले?

चौकशी सुरु असे पर्यंत सक्तीच्या रजेवर? निलंबनाची कारवाई होणार कि आणखी काही? तालुका वासियांना प्रतीक्षा

दोडामार्ग

दोडामार्ग शहरात ३० ऑक्टॉबर रोजी चार युवकांना पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी मारहाण केली होती. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोनही त्यांनी घेतले नव्हते, मारहाण झालेला एक युवक आत्यवस्थ झाला होता त्यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षकांना जाबही विचारला होता. यांनतर त्यांची खाते निहाय चौकशी होणार असे सांगण्यात आले होते, याबाबत त्या चार युवकांचे जबाबही नोंदवण्यात आले होते, त्यांनतर त्यांना आता दोषी ठरवत त्यांच्यावर कारवाई करताना त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्ताकडून कळते.

दोडामार्ग तालुका हा शांतता प्रिय तालुका म्हणून समजला जातो मात्र अशा प्रकारे एका जबाबदार अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार वागण्यामुळे हा तालुका अशांत बनला मात्र त्याला योग्य न्याय वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळाला तसेच अशा प्रकारची दादागिरी तालुका वासिय खपवून घेणार नाही, हेही तालुका वासियांनी दाखवून दिले. मात्र या कारवाईने तालुका वासियांनी समाधान व्यक्त केले आहे. आशाच प्रकारे येथील अवैध धंदे बंद करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी वर्गाने लक्ष घालावे व “हप्तेखोर”अधिकारी वं कर्मचारी यावर कारवाई करावी अशी मागणी तालुका वासीयांची आहे.

*अशेच सर्वपक्षीय एकत्र येऊन लढल्यास दृष्ट शक्तींचा नाश करू : राजेंद्र म्हापसेकर*

दोडामार्ग शहरात चार युवकांना अमानुष पणे मारहाण झाल्याची घटना निंदनीय होती. मात्र यावेळी सर्व पक्षीय तसेच तालुका वासिय यांची एकजूट दिसली, “गाव करील ते राव काय करील?”या म्हणीचा प्रत्यय ही आला. त्यामुळे या तालुक्या कडे वक्र दृष्टीने बघणाऱ्या लोकांचा समूळ नायनाट तसेच तालुक्याचा विकास करण्यासाठी सर्व पक्षीयांनी एकत्रित यावे असे आवाहन माजी जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी केले. आज या मुजोर अधिकाऱ्यावर वरिष्टांनी कारवाई करताना त्याला सक्तीच्या रजेवर पाठवले यात त्यांचा गुन्हा सिद्ध होतो त्यांची योग्य ती चौकशी करून कायद्याच्या तरतुदी प्रमाणे कारवाई व्हावी अशी मागणी राजेंद्र म्हापसेकर यांनी केली. या त्रासातून तालुका वासियांची सुटका केल्याबद्दल त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे आभारही मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा