*पत्रकार, लेखक कवी ॲड.रुपेश पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*मन तेविले*
लक्ष दीप उजळले,
आनंद मन तेविले.
गाभाऱ्यात मंदिराचे,
देव दिवाळीत हासले.
गगन आता कंदिलाने,
अंगण रांगोळी शोभिले.
सांजवाती भिजून जाता,
धन मंत्र दिवे लागले.
सकळ जनी रामाचे,
विजयी स्वागत जाहले.
ताशे कसे तडाडले,
सुरं सनईचे वाजले.
नारायणी लक्ष्मीचे,
सौख्य आज लाभले.
मंगल दिनी संसाराचे,
सह जीवन भारले.
आत्म जीव बंधनाचे,
दिवाळी सण सोहळे.
भाव भेटे जाणिवेला,
प्रीत सुगम गीत हे.
रुपेश पवार