आमदार नितेश राणे यांनी केली आगीत बेचिराख झालेल्या दुकानांची पाहणी ; नुकसानग्रस्त व्यावसायिकांना दिला धीर
कणकवली
आमदार नितेश राणे यांनी केली आगीत बेचिराख झालेल्या दुकानांची पाहणी ; नुकसानग्रस्त व्यावसायिकांना दिला धीर*
कणकवली पटवर्धन चौकातील आर बी बेकरी, बर्डे मेडिकल व राजू गावणकर यांचे कार्यालय शॉर्टसर्किटने आग लागत जळाल्यानंतर घटनेची माहिती मिळताच कणकवली मतदारसंघाचे आमदार व महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त नागरिकांशी चर्चा करत त्यांना धीर देखील दिला.
यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कणकवली जमागी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, राजू गवाणकर, राजा पाटकर, नवराज झेमने, जावेद शेख आणि उपस्थित होते.