*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार अरुणजी गांगल लिखित अप्रतिम गीत रचना*
*”धन्वंतरी देव”*
धन्वंतरीचे करूया नित्य स्मरण पूजन
धनत्रयोदशीला देई आरोग्याचे दानIIधृII
विष्णू अवतारा पैकी धन्वंतरी एक ज्ञात
पूर्वी देव दानवानी केले समुद्रमंथन
समुद्रमंथनातून बाहेर आली चौदा रत्नII1II
त्यापैकी लक्ष्मी कौस्तुभ धन्वंतरी पारिजात
आयुर्वेद शल्यशास्त्रात राहे तो पारंगत
देव अमर झाले दिव्य औषधीच्या योगानंII2II
धन्वंतरी देवाच्या हाती आहे अमृत कलश
तेजस्वी चतुर्भुज करी पीत वस्त्र परिधान
हाती अभय मुद्रा जळू शंख अष्ट आयुर्वेदII3II
आयुष्य प्रवाहात चालू असते समुद्रमंथन
अमृत स्त्राव वाढवणारे खावे खाद्यपदार्थ
मिळे ऊर्जा स्रोत आरोग्य हेच खरे धनII4II
धन्वंतरी आहे देवांचे प्रधान दैवत
धन्वंतरीला संबोधतात देवांचा वैद्य
आरोग्य रक्षक धन्वंतरीचे अढळ स्थानII5II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र
पिन.410201.Cell.9373811677.