You are currently viewing उपरकर, सतीश सावंत,गौरीशंकर खोत हे सोन्याची घर पाडून मातीचा शौचालय बांधणारे

उपरकर, सतीश सावंत,गौरीशंकर खोत हे सोन्याची घर पाडून मातीचा शौचालय बांधणारे

*भाजपचे जेष्ठ पदाधिकारी सुरेश सावंत यांची जोरदार टीका*

*माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यामुळे ज्यांची ओळख झाली त्यांनी स्वतःची लायकी ओळखून टीका करावी

 

कणकवली :

सोन्याची घरे पाडून मातीचे शौचालय बांधणाऱ्या उपरकर,सतीश सावंत आणि गौरीशंकर खोत यांची राणे कुटुंबावर बोलण्याची लायकी नाही. नगरपंचायतिच्या निवडणुकीमधे पराभव झालेल्या उमेदवाराचा विधानसभेत प्रचार करावा लागतो ही हीच तुमची लायकी आहे. अशी जोरदार टीका भाजपचे जेष्ठ पदाधिकारी सुरेश सावंत यांनी केली. आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना जोरदार प्रतिउत्तर दिले.

सुरेश सावंत म्हणाले, राणे कुटुंबाची मुख्यमंत्र्यांपासून ते भारताच्या पंतप्रधानानकडून राणे कुटुंबाची होणारी प्रशंसा बघुन पाण्यातील मासे जसे पाण्याच्या बाहेर आल्यावर तडपडतात तश्या प्रकारचे हे दळभद्री लोक आहात. राणे कुटुंबाबरोबर असताना त्यावेळी तुम्ही कसे दाबात, रुबाबात वागत होता आणि आता तुमची परिस्थिती किती वाईट आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही राणे साहेबांवर करत असलेली टीक आहे.

जिल्हा परिषद सदस्य पद आणि आमदार राहिलेले उपरकर आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद दहा वर्षे भूषविलेले व जिल्हा परीषद अध्यक्ष भूषविलेले सतीश सावंत आणि बीएसटी मध्ये उच्च पदी असलेले गौरीशंकर खोत यांना कणकवली नगरपंचायतिच्या निवडणुकी मधे पराभव झालेल्या उमेदवाराचा प्रचार करावा लागतो ही दु्दैवाची बाब आहे. अशी जोरदार चर्चा कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघातील जनतेमध्ये आहे.

आपण सर्वजण म्हणता राणे साहेब 1990 साली आपल्या मुळेच निवडून आले. जर तुमच्यामुळेच राणे साहेब आमदार झालेत असे म्हणत असाल तर मग आपण राणे साहेबांना सोडुन किती वर्ष झालीत. आपण कोणाकोणाला मोठे केलात.किती लोक मोठे झाले.याउलट 2005 साली उपरकर हे कणकवली मालवणच्या पोट निवडणुकीमध्ये राणेसाहेबांविरुद्ध शिवसेनेचे उमेदवार म्हणुन उभे होते त्यावेळी त्यांचे डीपॉजिट सुद्धा जप्त झाले.हे ज्वलंत उदाहरणन जनतेसमोर आहे. त्यामुळे तुम्ही निष्क्रिय आहात अणि राणे साहेबांना निवडून देणारे कार्यकर्ते हे वेगळे होते तुम्ही फक्त राणे साहेब निवडून आल्या नंतर त्यांचा बरोबर फिरण्याचे अणि आपली तुंबडी कशी भरेल या उद्देशाने सोबत होता यावरून हे सिद्ध होत आहे.

आपण राणे साहेबांच्या कुंडल्या आहेत असे म्हणता तर मग आमच्याकडे सुद्धा तुमच्या सर्वांच्या कुंडल्या आहेत. या जिह्यात आपण कोणतरी विशेष आहोत म्हणुन जर मिरवत असला तर तुमच्या पूर्वी सुद्धा जनतेची सेवा करणारे अनेक लोक या सिंधुदुर्गात कार्यकर्ते म्हणुन जिवंत आहेत म्हणुन तुम्ही यापुढे टीका करत असाल तर तुमच्या सुद्धा कुंडल्या आमच्याकडे आहेत त्या बाहेर काडल्या जातील येवढं लक्षात ठेवा.असा इशारा सुरेश सावंत यांनी दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा