You are currently viewing आंबेगाव शाळेत स्काऊट गाईड अंतर्गत अनोखी दिवाळी

आंबेगाव शाळेत स्काऊट गाईड अंतर्गत अनोखी दिवाळी

आंबेगाव शाळेत स्काऊट गाईड अंतर्गत अनोखी दिवाळी

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक उपक्रमशील शाळा असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव शाळा नं.1 येथे दिवाळी सणानिमित्त एका अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थीनिर्मित पर्यावरणपूरक आकाशकंदिल तसेच सुगंधी उटणे यांची निर्मिती करण्यात आली. तसेच या विद्यार्थीनिर्मित साहित्याचे भव्य प्रदर्शन व विक्री करण्यात आली . शाळेच्या स्काऊट गाईड पथकामार्फत हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या प्रदर्शनातून 100 हून अधिक आकाशकंदिल तसेच सुगंधी उटणे पाकिटांची विक्री करत विद्यार्थ्यांनी तब्बल 20,000 रुपयांची “खरी कमाई केली.शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम अस्मिता मुननकर तसेच शाळेच्या पदवीधर शिक्षिका श्रीम रसिका नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आकर्षक आकाशकंदीलांची निर्मिती केली तसेच सुगंधी उटणे तयार केले. उपशिक्षिका श्रीम स्नेहल कांबळे यांचेही विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेचे स्काऊट मास्टर श्री प्रदीपकुमार म्हाडगुत आणि स्काऊट मास्टर श्री नितीन सावंत यांनी बहुमोल सहकार्य केले. तसेच पालकांनी या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी मेहनत घेतली .

या आकाशकंदिल प्रदर्शनाचे उद्धाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष श्रीम साक्षी राऊळ यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी निरामय विकास केंद्र कोलगावच्या श्रीम.वंदना करंबेळकर उपस्थित होत्या. तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष तेजस्वी गावडे , शिक्षणतज्ञ श्री राहुल राणे, शाळेच्या सर्व समित्यांचे सदस्य उपस्थित होते. या प्रदर्शनाला आंबेगाव सरपंच श्री शिवाजी परब तसेच उपसरपंच श्री रमेश गावडे ,ग्रामपंचायत सदस्य श्री योगेश गवळी , सेवानिवृत्त मुख्याध्यापिका श्रीम एकता सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री संतोष राणे,श्री अण्णा केळुस्कर,श्री मंगेश सावंत तसेच अनेक शिक्षणप्रेमी ग्रामस्थ,पालक यांनी भेट देत कौतुक केले . विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार रुजविणारा आंबेगाव शाळेचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे .


प्रतिक्रिया व्यक्त करा