सातारा :
सातारा येथे सारांश दिवाळी अंकाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हस्ते जलमंदिर राजवाड्यात प्रकाशन करण्यात आले. यावेळी राजेंनी सारांश दिवाळी अंकाचे कौतुक केले त्यांनी अंक बारकाईने पाहून अंकाबद्दल शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास महाराष्ट्र शासनाचे प्राधिकृत अधिकारी अडव्होकेट धनंजय सिंहासने, प्राध्यापक कल्याण भोसले, माझी सभापती सुनील तात्या काटकर आणि सावंतवाडी चे सरदार घराण्यातील जीविका रिसॉर्टचे मालक नारायणजी सावंत उपस्थित होते यावेळी उदयनराजेंनी दबडे यांच्या चित्रांचे कौतुक करून पुन्हा येण्याचे आमंत्रण दिले.