*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*भास गुलाबी*
*************
तुला स्मरता स्मरता आयुष्य संपले
तरी अजुनही तव स्मृतीत गंधाळतो
त्याच वेली त्याच कुसुमसुमनांजली
त्या भावस्पर्शात अलवार मी दंगतो
मिटल्या अधरी तुझेच हास्य लाघवी
मी लोचनात या माझ्या कुरवाळीतो
अंतरी भास गुलाबी मिटल्या मिठीचे
त्या प्रीतरंगल्या भावनांना आठवितो
सत्य हेच काळजातील जरी अव्यक्त
तरी अजूनही तव स्मृतीत गंधाळतो
*****************************
*रचना क्र. १८२*
*#©️ वि.ग.सातपुते.(भावकवी )*
*📞( 9766544908 )*