कुडाळ मालवण मधील जनतेला ट्रॅफिक जाम आणि उष्माघाताचा त्रास नको या भावनेने निलेशजी राणेंनी ‘उमेदवारी नामांकन अर्ज भरताना गर्दी जमाव टाळणे’ हे दम सुज्ञ नेत्याने परिस्थितीचे भान राखून लोकहित जपल्याचे लक्षण आहे..!
कुडाळ :
सोमवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२४ रोजी “वसुबारस” सणाने दिपावली सणाचा शुभारंभ… अगदी याचं शुभमुहूर्तावार भविष्यातील कुडाळ मालवणचे फिक्स आमदार म्हणून ज्यांच्या नावाचे “भगवे” वादळ सिंधुदुर्ग जिल्हातील गावागावात घोंगावते आहे असे महायुतीचे उमेदवार डाँ.श्री.निलेश नारायण राणे यांनी त्यांचा उमेदवारी नामांकन अर्ज भरताना दाखवलेला समजूतदारपणा अवघ्या कुडाळ- मालवण वासियांनी अनुभवला.ज्यांच्या एका हाकेवर जिल्ह्यातील नव्हेच तर राज्यातील लाखो तरुण धावून येऊ शकतात अशा निलेश राणेंनी त्यांचा उमेदवारी नामांकन अर्ज भरताना केवळ जनतेला “वाहतूक कोंडी व उष्माघाताचा त्रास नको” या भावनेने जमाव रॅली टाळली असे असताना उबाठा मधील काही अल्लड व बिनडोक कार्यकर्ते त्यांच्यावर लपून छपून टीका करत आहेत याची प्रचंड कीव येते.गुरुवारी उबाठाचे उमेदवार वैभव नाईकांनी उमेदवारी अर्ज भरताना कुडाळ शहरातून काढलेल्या रॅलीने वाहतूक कोंडी होऊन अनेक शालेय विद्यार्थ्यांना सहामाही परीक्षेच्या पेपरला पोहचण्यास उशिर झाला.ज्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान झालेचं याशिवाय पालकांना मानसिक त्रास देखील झाला. याशिवाय भर उन्हातून काढलेली रॅली व त्यातचं उरकून टाकलेली जाहीर सभा ज्यामुळे अनेक जण चक्कर (भोवळ) येऊन देखील पडले. निलेश राणेंनी राखलेले परिस्थितीचे भान लक्षणीय व कौतुकास्पद आहे. अहो, निलेश राणेंच्या पक्षप्रवेशाच्या भव्य दिव्य कार्यक्रमात लाखोंच्या जनसमुदयासाठी घातलेल्या मंडपावरून टीका करताना तुमच्या उमेदवाराने केवळ पैसे खर्च होऊ नयेत यासाठी कार्यकर्त्यांना उन्हातान्हात उभं केलं खरं तर याची लाज वाटणे अपेक्षित आहे मग कसल्या फुशारक्या मारता? बरं अशाने वैभव नाईकांच्या मनातील भावना स्पष्टपणे दिसून आली हा..! मागच्या निवडणुकीत मिळालेला निसटता विजय आणि यावेळी लोकांमध्ये जागृत झालेली कमालीची क्रांतीची भावना व निलेश राणेंच्या विजयाचे वातावरण पाहता पुढे जाऊन जर का आपला पराभवाच होणार असेल तर कशाला हवाय मंडप आणि कशाला करायची कार्यकर्त्यांची चिंता.. हे खरे वास्तव आहे.
मुळात कार्यकर्त्यांना उन पाऊसाचा त्रास होऊ नये या भावनेने तुमच्या मते लाखोंचा मंडप घातला गेला यामागे खर्च करण्याची “दानत” लागते हे आधी लक्षात घ्या. मागील दहा वर्षात कुडाळ मालवणवर जो अन्याय झालाय…त्याची परतफेड जनताच करणार आहे एवढं लक्षात ठेवा.. मागील दहा वर्ष तुम्हा लोकांनी राणे कुटुंबावर चालवलेली कथोकथित दहशतवादाची टेप यापुढे लोकं ऐकणार नाहीत हे आपल्याला एव्हाना कळून चुकले आहे. म्हणूनच .उगाच काहीतरी रंगवून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा कुडाळ मालवण सहित एकूण जिल्ह्याच्या विकासात्मक जडणघडणीत मागील दहा वर्षात आमदार नाईकांनी वा उद्धव ठाकरेंनी नेमके कोणते योगदान दिले याचं आत्मपरीक्षण करा… आज निलेश राणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाबाबत जे व्हिजन मांडत आहेत ते जनतेला भावले आहेचं,शिवाय त्या गोष्टी घडवण्याची धमक देखील त्यांच्यात आहे हे कुडाळ मालवणच्या जनतेला पुरेपूर ज्ञात आहे.लोकं आता तुमच्या भावनिक राजकारणाला बळी पडणार नाहीत याची चाहूल लागल्याने अल्लड उबाठा सैनिक सोशल मीडियावर कल्पोकल्पित अफवांचे मेसेज बेनामी व्हायरल करीत आहेत याची कीव करावीशी वाटते. निलेश राणेंनी समर्थपणे “शिवधनुष्य” हाती घेतल्यानंतर उबाठा मधील काहीं सैर भैर होऊन राणे कुटुंबाबत काहीही बरळत सुटले आहेत.त्यांना एकच प्रेमाचा सल्ला आहे की, उगाच आगीशी खेळण्याचा प्रयत्न करू नका..! तुम्ही मागील दहा वर्षात मतदार संघात काय “दिवे” लावलेत ते दिवाळी नंतर २० तारीख ला जनतेच्या दरबारात अनुभवाल एवढं मात्र नक्की..!