You are currently viewing दिवाळीचे पाच दिवस

दिवाळीचे पाच दिवस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*दिवाळीचे पाच दिवस*

🌹🪔🪔🪔🪔🪔🌹

 

सण दीपोत्सवाचा

सजवू या पणत्या

सात्विक प्रकाश देती

ज्योती मिणमिणत्या।।१

 

एकादशी ,वसुबारस

गाईगुरं पूजनाला

धन असतं शेतकर्याचं

आनंद होतो मनाला।।२

 

धनत्रयोदशी लक्ष्मी कुबेर

पुजून यम दीपदान

अकाल मृत्यू हरण

आरोग्याचे मागू वरदान।।३

 

दुष्ट प्रवृत्ती नरकासूर

वध नरकचतुर्दशीला

बोच-या थंडीत उटणेस्नान

नवे कपडे,फराळ,देवदर्शनाला।।४

 

सुखसमृद्धी लक्ष्मीपूजन

पाडवा येई नव सौख्याचा

नवसंकल्प नवचेतना

उत्साह नवा संचरण्याचा।।५

 

भाऊबीजेची ओढ मनी

भाऊरायास ओवाळते

सासर माहेर सुखी राहो

प्रार्थना भगवंताला करते।।६

🌸🌸🪔🌸🌸🪔🌸🌸

 

*अरूणा दुद्दलवार*@✍️🪔🌸

प्रतिक्रिया व्यक्त करा