You are currently viewing सांगावा

सांगावा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या कवयित्री सरिता परसोडकर*

 

*सांगावा*

 

लेक हळूच बोलली

दिवाळीचा सण आला

आई जाईल माहेरा

मामाला उशीर का झाला.

 

बाबा सांगावा धाडाना

माझ्या लाडक्या मामाला

नाही करणार हट्ट

करील मदत कामाला.।

 

आहे ठाऊक आम्हाला

वेळ मामाला तो नाही

आम्ही राहील दोन दिवस

नाही मागणार काही..

 

डोळे झाकले पाण्याने

म्हणे थांब पोरी थोडी

दोन शब्दाच्या पत्रात

तेव्हा होती कीती गोडी..

 

आता कोण म्हणेल तुला

माझी गोड नातं आली

पाय धुवायला पाणी

ठेवेल पायरीच्या खाली..

 

 

सौ परसोडकर, पुसद✍🏻

प्रतिक्रिया व्यक्त करा