सावंतवाडी शहरांमध्ये मोबाईल वर बोलत भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या युवकांवर कारवाई होणे आवश्यक – राजू मसुरकर
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्हा सावंतवाडी शहरांमध्ये मोती तलावाच्या सभोवती अनेक युवक भरधाव वेगाने मोटरसायकल व फोर व्हीलर वाहने चालवून त्याचप्रमाणे मोबाईल कानावर लावून बोलत असतात अशा युवकांवरती दंडात्मक कार्यवाही न्यायालयामार्फत व्हावी.
*सावंतवाडी शहरांमध्ये मोती तलावाच्या सभोवती अनेक युवक कानावर मोबाईल वरती बोलत भरधाव वेगाने वाहने चालवत असतात यामुळे अनेक अपघात घडतात यामध्ये वयोवृद्ध, महिला, जेष्ठ नागरिक, गरोदर महिला व लहान बालक यांना जीव मुठीत घेऊन फिरावे लागते कधी कधी तलावाच्या सभोवती फुटपाटवरुन समोर बाजार खरेदी करताना समोरील दुकानांमध्ये मार्केटिंग करण्यासाठी क्रॉसिंग करावे लागते*
*त्यामुळे अनेक युवक भरधाव वेगाने कानावरती मोबाईल लावून बोलत वाहने चालवत असतात त्यामुळे अनेक गंभीर अपघात होतात अपघात होऊन तसेच रुग्णालयामध्ये रुग्णांची गर्दी मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांवर रुग्णांवर इलाज करताना मानसिक ताण येतो*
*तसेच या बुलेट मोटार सायकल च्या सायलेन्सर मधून येणारा कर्कश ध्वनी नियमाच्या बाहेर जाऊन असे सायलेन्सर बसवले जातात यामुळे सुद्धा नागरिकांना त्रास होत असतो*
*युवक व युवती कानाला फोन लावून शहरांमध्ये सुद्धा भरधाव वेगाने गाड्या चालवत असतात यांच्यामुळे अनेक अपघात घडू शकतात यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांचे फिरते पथक व अशा व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही न्यायालयामार्फत व्हावी*
*सायंकाळच्या वेळी दिवाळीच्या सणासुदीत असे अपघात होऊ नये म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे आदेश देऊन असे वाहन चालक युवकांवर दंडात्मक कार्यवाही न्यायालयामार्फत व्हावी अशी विनंती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी केली आहे*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*आपला विश्वासू*
*राजेंद्र प्रभाकर मसूरकर*
*जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे व्यापारी*
*सावंतवाडी उभाबाजार*
*जिल्हा सिंधुदुर्ग*
*संपर्क क्र.9422435760*
🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑