जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या कार्याला माझा सलाम;
सावंतवाडी :
मी भाजप पक्षाचाच कार्यकर्ता आहे. भाजप पक्षावर माझे नितांत प्रेम आहे. या पक्षाच्या जडण घडणीमुळे आपण शिकलो व मोठे झालो. त्यामुळे मी भाजप पक्षातच आहे हा पक्ष सोडून कुठेही जाणार नाही, या पक्षाचे नेते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी मोठा फॅन आहे, तर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या जिल्ह्यात केलेल्या कार्याला मी सलाम करतो असे गौरव उद्गार अपक्ष उमेदवार युवा नेते विशाल परब यांनी विराट जनसमुदायासमोर बोलताना काढले.
मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून शेवटपर्यंत काम करत राहिन, भाजप पक्षाच्या प्रत्येक नेत्यानांचा, जिल्हा पदाधिकाऱ्यांचा सन्मान करतो, त्यांनी मला खूप प्रेम व आदर दिला, तो मी कधी विसरू शकत नाही असे सांगितले.
या कोकणाचे भाग्यविधाते व ज्यांनी जिल्ह्यात व कोकणात चांगले काम केले व आमचे भवितव्य घडवले असे जिल्हाचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनाही मी सलाम करतो. त्यांच्या मदतीमुळेच माझ्यासारखा कार्यकर्ता घडू शकला व आमचे भवितव्य घडवले हे मी कदापि विसरू शकत नाही. तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून माझा समाजकारणातील व राजकारणातील प्रवास असाच अखंडपणे सुरू ठेवेन, तुम्ही मला प्रेम द्या मी तुम्हाला विकास देईन असा शब्द यावेळी बोलताना विशाल परब यांनी उपस्थित जनसमुदायाला दिला.