*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे सन्माननीय सदस्य कवी सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हे राष्ट्र धर्मज्ञ अधर्म खंडीत*
चक्रमंडीत ध्वज त्रिरंग शोभीत
ध्यानाकर्षित प्रसन्न जन वंदीत ||धृ||
हिंदूहृदय जन राष्ट्र समर्पित
विज्ञान अध्यात्म राष्ट्रबल वंदीत ||१||
संविधान जन रीती सुख अर्पित
हिंदुत्व जपू जात धर्म विरहित |
जात धर्म जन राष्ट्रा गौरवित
तेच राखू सदा शर्थीत अबाधित ||२||
शान्ततेतले ते मवाळ सुभाषित
राष्ट्रासाठी वज्राघातासही झेलीत
होऊनि कठीण वज्रासही भेदीत
मानव हित राष्ट्र राखू अबाधित ||३||
कवी :- श्री सोमा चंद्रकला चंद्रकांत गावडे.
फणसखोल, आसोली, ता.-वेंगुर्ला,
जि.- सिंधुदुर्ग, राज्य – महाराष्ट्र.