You are currently viewing अखेर त्या डॉक्टरांची मृत्यूशी झुंज अपयशी

अखेर त्या डॉक्टरांची मृत्यूशी झुंज अपयशी

कणकवली

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ एस एस पाटील यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. काल  रात्री साडेनऊ वाजता त्यांचे कोल्हापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सहदेव पाटील ब्रेन हॅमरेज मुळे कोल्हापूर येथील सिद्धांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. सोमवार ४ जानेवारी रोजी सकाळी मॉर्निंग वॉक ला गेले असतानाच त्यांना ब्रेन हॅमरेज झाले होते. तात्काळ त्यांना सिद्धांत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. ब्रेन हॅमरेज झाल्यापासून ते कोमामध्ये होते. अथक उपचार करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेर काल रात्री साडे नऊच्या सुमारास कोमामध्ये असतानाच डॉ.पाटील यांचे निधन झाले. निष्णात सर्जन असलेल्या डॉ .पाटील यांनी आपल्या वैद्यकीय अधिक्षकपदाच्या काळात कणकवली उपजिल्हा रुग्णालय पुन्हा नावारूपाला आणले होते. अत्यंत अवघड शस्त्रक्रीयाही डॉ पाटील यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात लीलया यशस्वी पार पाडल्या होत्या. डॉ. पाटील कणकवलीत रुजू झाल्यापासून कणकवली उपजिल्हा रुग्णालय हे सर्वसामान्य रुग्णांचे आधारवड बनले होते. डॉ पाटील यांची अचानक झालेली एक्झिट सर्वांनाच चटका लावून गेली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा