You are currently viewing निलेश राणे उद्या २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार

निलेश राणे उद्या २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार

कुडाळ :

कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार निलेश राणे उद्या २८ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता कुडाळ येथील प्रांताधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी माहिती कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी दिली आहे.

यावेळी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर, आम. नितेश राणे, तसेच महायुतीचे घटक पक्ष भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय यांचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल प्रक्रियेत उपस्थित राहावे, असे आवाहन कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा