निरीक्षण व बालगृहात मेळाव्याचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह ओरोस-सिंधुदुर्ग येथे दिपावली सणानिमित्त संस्थेतील बालकांचा आनंत व्दिगुणीत करणे व Back To Institute कार्यक्रम अंतर्गत माजी प्रवेशित सहभागी मेळावा दि. 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता आयोजित करण्यात आले असल्याची माहिती शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृहाचे अधिक्षक बी.जी. काटकर यांनी दिली आहे.
शासकीय मुलांचे निरीक्षणगृह व बालगृह ओरोस-सिंधुदुर्ग ही संस्था महिला व बाल विकास विभाग व शासन यांच्यामार्फत दि. 12 डिसेंबर 1984 पासून 6 ते 8 वयोगटातील अनाथ निराधार, निराश्रीत, काळजी व संरक्षणाची गरज तसेच विधीसंघर्षग्रस्त बालकांच्यासाठी (मुलांच्यासाठी) कार्यरत आहे.
या संस्थेमध्ये बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 नुसार सद्यस्थितीमध्ये बाल कल्याण समिती यांच्या आदेशान्वये काळजी व संरक्षणाकरीता एकूण 5 बालके दाखल आहेत.
या संस्थेतील बालकांचा दिपावली सणानिमित्त आनंद व्दिगुणीत करण्यासाठी समाजातील मान्यवरांना तसेच प्रशासकीय अधिकारी यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करुन त्यांचे प्रमुख उपस्थितीत संस्थेमध्ये एक दिवसीय दिपावली सण व विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन संस्थेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी करुन घेणे व प्रवेशितांचा उत्साह वाढविणे, संस्थेची व प्रवेशितांविषयी थोडक्यात माहिती देणे आणि Back To Institute कार्यक्रम अंतर्गत एकूण 15 आजी- माजी प्रवेशित सहभागी मेळावा आयोजित करुन दाखल असलेल्या बालकांशी आपले अनुभवाचे देवाण – घेवाण करुन हितगुज करुन एकमेकांशी संवाद साधवा व त्यातुन प्रेरणा घ्यावी या उद्देशाने दि. 29 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता या संस्थेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.