कणकवली :
कणकवली विधानसभा मतदारसंघातील आमदार नितेश राणे २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत कणकवली देवगड वैभववाडी मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार आहे यावेळी गांगो मंदिर ते प्रांत कार्यालय अशी भव्य रॅली तसेच उपजिल्हा रुग्णालय समोरील मैदानावर जाहीर सभा होणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी प्रसिद्ध पत्राद्वारे दिली.
यावेळी खासदार नारायणराव राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, गोव्याचे मंत्री आणि कोकण प्रभारी विश्वजीत राणे, माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार अजित गोगाटे तसेच जिल्ह्यातील मान्यवर मंडळ उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील भाजपा आणि महायुतीचे हितचिंतक तसेच जनता यांनी मोठ्या संख्येने यात सामील असे आवाहन प्रभाकर सावंत यांनी केले आहे.