You are currently viewing ।। जय गजानन ।। गण गण गणात बोते ।।

।। जय गजानन ।। गण गण गणात बोते ।।

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखक कवी श्री अरुण वि. देशपांडे लिखित श्रीगजानन विजय काव्यांजली*

 

।। जय गजानन ।। गण गण गणात बोते ।।

_______________________

श्री गजानन विजय काव्यांजली काव्यपुष्प – ६९ वे

अध्याय – १२ वा , कविता – तिसरी

________________________

 

श्री सद्गुरूंना प्रार्थीतो । वंदन चरणी करितो । मागणे मागतो । कृपा असो मजवरी ।। १ ।।

 

स्मरण नित्य करावे । ओठी नाम असावे । भजन करावे ।

श्री हरीचे ।। २ ।।

 

अध्याय बाराव्यात पुढे आता । आहे सुरस कथा । परिक्षेची ही कथा । शिष्य पितांबराची ।। ३ ।।

 

शिष्य स्वामींचे सदा भोवती । तत्पर सेवा करिती । मठात रहाती । स्वामींच्या सहवासात ।। ४ ।।

 

पितांबराची रहाणे धड नसे । पार्श्व-अंग उघडे दिसे । होई त्याचे हसे । लोकांसमोर मठात ।। ५ ।।

 

स्वामी म्हणे- ऐक पितांबर । बदल तुझे फाटके धोतर ।

हा दुपेटा असुदे अंगावर । नको सोडुस, कुणी काही म्हणो ।६।।

 

स्वामींनी केले हे जे काही । इतरांना देखवले नाही । सहन कुणा हे होणार नाही । जाणिती स्वामी सारे ।। ७ ।।

 

शिष्य नाना बोल लावीती। दूषण पितांबरास देती । राहू नको

मठाप्रती । जा निघून तू पितांबरा ।। ८ ।।

 

स्वामी पितांबराला बोलले । आता तू इथून जा भले ।

मुक्कामाचे दिवस सरले ।तुझे आता शेगावचे ।। ९ ।।

******************

करी क्रमशः लेखन कवी अरुणदास

___________________________

कवी अरुणदास – अरुण वि. देशपांडे – पुणे.

___________________________

प्रतिक्रिया व्यक्त करा