*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”गजरा”*
फुलांचा गजरा आहे शृंगाराचे भूषण
सोळा शृंगारे मनुष्याचे होते सुखी जीवनIIधृII
गजरा खुलवते मनुष्याचे सौंदर्यपण
फुले ईश्वरीय देणं निसर्गाचे वरदान
सर्व प्रकारची सुमन देतात आनंदII1II
फुलांना असतात विविध आकार सुगंध
मन प्रसन्न करते सर्व वातावरण
ऊर्जा आभा उमंग वाढते उमदेपणII2II
प्रत्येक ऋतूत येत भिन्न प्रकारची फुलं
आयुर्वेदिक गुणांनी आरोग्य राहे संपन्न
फुलांचे सहवासाने होते पित्त शमनII3II
स्त्री पुरुष सर्वां करी गजरा आकर्षित
ईश्वर मूर्तीचे खुलते सौंदर्य गजऱ्यानं
गुंफताना माळतांना मन होते प्रसन्नII4II
श्री अरुण गांगल कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन.410201.Cell.9373811677.